संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

घटस्थापनेच्या मुहूर्तावर सप्तशृंगी मंदिर खुले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – सप्तशृंगी देवी मंदिराची देखभाल दुरुस्ती तसेच गाभार्‍याला चांदीचा पत्रा बसविण्याच्या कामासाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून, 26 सप्टेंबरपासून म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुले करणार आहे. सप्तशृंगी हे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. देशभरातून हजारो भाविक सप्तशृंग गडावर दर्शनासाठी येतात. परंतु गेल्या 22 जुलैपासून सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचे वज्रलेप करण्याच्या कामामुळे आणि मूर्ती संवर्धनाचे काम सुरू असल्याने व गडावरील पायर्‍या दुरुस्तीच्या कामामुळे गडावरील दर्शन गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यांपासून सप्तशृंगीचे मंदिर हे बंद ठेवण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami