संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

गौतम अदानी यांनी आंध्रचे गंगावरम बंदर खरेदी केले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती – आंध्र प्रदेशातील गंगावरम हे आणखी एक प्रमुख बंदर गौतम अदानी यांच्या समूहातील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनोमिक झोनने खरेदी केले आहे. त्यामुळे अदानी समूहातील बंदरांची संख्या १२ झाली आहे. हे बंदर त्यांनी ६ हजार २०० कोटींना विकत घेतले. यापूर्वी या बंदराची ४० टक्के हिस्सेदारी अदानी समूहाकडे होती. आता त्यांनी उर्वरित ५८.१ टक्के हिस्साही विकत घेतला आहे.

गंगावरम हे सर्व हवामानात खोल पाण्याचे बहुउद्देशीय बंदर आहे. पूर्ण लोडेड सुपर कॅप आकाराच्या जहाजांची हाताळणी करण्यासाठी ते सक्षम आहे. या बंदरात ९ धक्के आहेत. रेल्वे आणि रस्त्यांनी ते जोडलेले आहे. येथून सर्वात जास्त जलवाहतूक होते. हे बंदर अदानी समूहाने खरेदी केले आहे. बंदराचे ५१७ मिलियन शेअर्स अदानी समूहाने प्रत्येकी १२० रुपयांप्रमाणे ६ हजार २०० कोटींना खरेदी केले आहेत. या व्यवहाराला अहमदाबाद आणि हैदराबाद एनसीएलटीने परवानगी दिली आहे. यामुळे अदानी समूहाचा बंदर विभाग आणखी भक्कम झाला आहे. गंगावरम बंदराला रेल्वे आणि रस्ते कनेक्टिव्हिटीचे नेटवर्क आहे. ८ राज्यांमध्ये पसरलेल्या व्यापाराचे ते प्रवेशद्वार आहे, अशी माहिती अदानी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक करण अदानी यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami