संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

गोव्यात शिक्षकांवर अनोखी सक्ती; आता संध्याकाळपर्यंत सुट्टी नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी – गोवा सरकारकडून शिक्षकांसाठी आता एक अनोखा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार आता गोव्यातील शिक्षकांना रेमेडियल वर्ग घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. या वर्गांमुळे शिक्षकांना संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत शाळेतून सुट्टी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत गोवा विधानसभेत माहिती दिली.

शिक्षणात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे रेमेडियल वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. गोव्यातील सर्वच सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित विद्यालयांना हे वर्ग घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाविरोधात कोणत्याही तक्रारी घेऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभा आमदारांना केले आहे. या निर्णयाबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, केवळ रेमेडियल वर्गांमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारणे अशक्य असल्याचे बाणावलीचे आमदार वेन्सी वीएगश यांनी विधानसभेत म्हटले. त्यावेळी त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. प्राथमिक इयत्तेपासूनच शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिक्षक भरती करतानाच या गोष्टीची खबरदारी घेणे आवश्यक आहे. भरती केलेले शिक्षक हे सक्षम नसतील तर त्याचा काही फायदा नाही, असे विएगश यांनी सभागृहात सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami