संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

गोव्यात कासव संवर्धन मोहीम परिसरात संगीत पार्ट्यांचा धुडगूस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी – गोवा हे समुद्र किनार्‍यांनी नटलेले छोटेसे राज्य आहे. याठिकाणी तब्बल ४० समुद्र किनारे किनारे आहे.यातील मोरजी, मांद्रे आणि अश्वे या किनार्‍यांवर कासव संवर्धन मोहीम राबविली जाते. तरीही या समुद्र किनार्‍यावरील कासव संवर्धनासाठी आरक्षित असलेल्या जागेत रात्रभर संगीत पार्ट्यांचा धुडगूस दिसून येतो.तसेच या पार्ट्यां अगदी सकाळपर्यंत चालत असल्याने त्यांना परवानगी कशी काय मिळते असा सवाल आता वनमंत्री विश्वजीत राणे यांना गोवेकर प्रसाद शहापूरकर यांनी केला आहे.

वास्तविकता रात्री १० नंतर खुल्या जागेत संगीत कार्यक्रमांना बंदी आहे. तरीही या तिन्ही समुद्र किनारी रात्रभर संगीत पार्ट्या सुरू असल्याचे दिसून येते.पेडणे पोलिसांनी काही वेळा असे कार्यक्रम बंद केले आहेत.पण त्यांच्यावर गुन्हा नोंदविला नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अगदी सकाळपर्यंत हे ध्वनिप्रदूषण सुरू राहिल्याने ज्येष्ठ आणि आजारी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अश्वे येथील एका क्लबमध्ये तर चक्क रात्री १० वाजल्यानंतर पार्ट्या सुरू होतात आणि पहाटे ६ वाजेपर्यंत चालतात. त्यांच्यावर कारवाई का होत नाही?तसेच अशा कार्यक्रमांना उपजिल्हाधिकारी आणि उपअधीक्षक परवानगी तरी कशी मिळते असा सवाल संदेश नाईक यांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या