संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

गोव्यातील म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप १९ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

म्हापसा – गोव्यातील म्हापसा पालिका कर्मचाऱ्यांनी चार्टर ऑफ डिमांड अर्थात सनद मागणी पत्राच्या मागणीसंदर्भात पुकारलेले बेमुदत संप आंदोलन १९ ऑक्टोंबर पर्यत अखेर स्थगित करण्यात आले आहे.१८ ऑक्टोंबरपर्यंत या मागणीवर निर्णय घेण्यात यावा असे निर्देश सहाय्यक कामगार आयुक्तांनी म्हापसा पालिका मंडळाला दिले आहेत.
त्यामुळे १० ऑक्टोबरला पुकारलेला हा संप स्थगित केला आहे.दरम्यान, याबाबत दिलेल्या मुदतीत निर्णय न घेतल्यास मात्र २० ऑक्टोबरपासून हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत सुरू केले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे.

सहाय्यक कामगार आयुक्तांसमोर परवा शुक्रवारी पालिका कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सुनावणी झाली.यावेळी पालिका मंडळाने आपली बाजू मांडल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी पालिका मंडळाला १८ ऑक्टोंबर पर्यत निर्णय घेण्यास मुदत देऊन १९ ऑक्टोबरला यावर पुढील सुनावणी हेण्याची घोषणा केली.या सुनावणीवेळी पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू आणि अन्य पदाधिकारी तसेच नगरध्यक्षा शुभांगी वायंगणकर,काही नगरसेवक उपस्थित होते.तर यावेळी मुख्याधिकार यांनी आपला प्रतिनिधी या सुनावणीला पाठवला होता.दरम्यान,पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी ३ ऑक्टोबरपासून हातावर काळी पट्टी बांधून आंदोलन सुरू केली आहेत.तसेच जेवणाच्या वेळेत पालिका कार्यालयासमोर उभे राहून निदर्शने करत आहेत.विशेष म्हणजे हे निदर्शने कार्यक्रम मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami