बेळगाव : गोव्याचे मुख्यमनातरी डॉ. प्रमोद सावंत हे डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी बेळगाव येथे आले असता श्री क्षेत्र दक्षिण काशी म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिराला भेट दिली व पूजा केली. यावेळी भाजपचे नेते किरण जाधव व मंदिर ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्यासह चिकमंगळूर दत्तात्रय मठाचे पुरोहित समूह यांच्याकडून मंत्रोच्चारत मुख्यमंत्री सावंत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाची प्रशंसा केली, मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री व दत्तात्त्रेय मठाचे मठाधिपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे ट्रस्टी सुनील बाळेकुंद्री यांच्यासह ड़ॉ सेवेलारो उपस्थित होते.