संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएस कडे द्यावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हतत्या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपविण्यात यावा असा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. पानसरे कुटुंबियांच्या वकील अभय नेवगी यांच्यामार्फत हा अर्ज दहाला करण्यात आला आहे.

दरम्यान, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास असमाधानकारक असल्याच्या पानसरे कुटुंबियांच्या आरोपाची उच्च न्यायालयाने गुरुवारी दखल घेतली. तसेच गेल्या दोन वर्षांत प्रकरणाचा काय तपास केला हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. या प्रकरणाच्या तपसासाठी सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. एसआयटीच्या तपासबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गुरुवारी सूनावणी झाली. त्यावेळी हत्येच्या तपासात काहीच होत नसल्याची तक्रार पानसरे कुटुंबियांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयानेही त्याची दखल घेतली. तसेच गेल्या दोन वर्षांपासून तपासाचा अहवाल सादर न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच प्रकरणाचा काय तपास केला हे २१ जुलैपर्यंत स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले.

विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कर्नाटक येथील विचारवंत एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या चार जणांच्या हत्यांमागील सूत्रधार एकच आहे. मात्र त्यांना शोधण्यात सीबीआय आणि राज्याच्या एसआयटीला अपयश आले आहे. शिवाय एसआयटीच्या तपास अधिकाऱ्याकडेही अतिरिक्त ताण आहे. या पार्श्वभूमीवर पानसरे- दाभोलकर प्रकरणाचा तपास राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाकडे वर्ग करण्याची मागणी दोन्ही कुटुंबीयांनी केली. त्यावर याप्रकरणी उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami