संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती पुतिन जाणार नाहीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को-रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे युएसएसआरचे माजी राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसल्याचे क्रेमलिन कार्यालयाकडून सांगितले गेले आहे. गोर्बाचेव्ह यांचे सोमवारी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले असून ते दीर्घकाळ आजारी होते. त्यांचे अंत्यसंस्कार या आठवड्यात होणार आहेत. क्रेमलिन कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव म्हणाले, गुरुवारी पुतीन यांनी गोर्बाचेव्ह यांचे पार्थिव ठेवलेल्या हॉस्पिटलला भेट देऊन गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोर्बाचेव्ह यांचे अंत्यसंस्कार राजकीय इतमामाने पार पाडले जातील असेही त्यांनी सांगितले.
गोर्बाचेव्ह हे वादग्रस्त पण प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांच्या काळात प्रसिध्द होते.अमेरिकेबरोबर सुरु असलेले शीतयुद्ध रक्ताचा एक थेंबही न सांडता संपुष्टात आणण्याचे श्रेय गोर्बाचेव्ह यांना दिले जाते. त्याबद्दल गोर्बाचेव्ह यांना १९९० मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविले गेले होते.मात्र सोविएत रशियाचे विभाजन गोर्बाचेव थांबवू शकले नाहीत.गोर्बाचेव सोविएत रशियाचे आठवे आणि शेवटचे राष्ट्रपती होते. पुतीन यांच्या बरोबर त्यांचे संबंध कधीच सलोख्याचे नव्हते असेही म्हटले जाते. सोविएत युनियनचे विभाजन हा गोर्बाचेव नीतीचा परिणाम असल्याचे पुतीन यांचे मत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami