सांगली:- भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्याचा निर्णय पडळकरवाडी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आला आहे.याबाबत पडळकरवाडीमध्ये प्रमुख कार्यकर्ते, नेत्यांची बैठक देखील पार पडलेली आहे.आमदार पडळकरांच्या मातोश्री यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्याबाबत पडळकरवाडीमध्ये गुरुवारी बैठक देखील पार पडली आहे. ज्यामध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पुंडलिक पडळकर यांना बिनविरोध निवडून आणण्याबाबत निर्धार करण्यात आला आहे.
सरपंचपद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 20 डिसेंबरनंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच भाजपचे स्टार प्रचारक देखील आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना विराजमान करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.