संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

गोध्रा हत्याकांडातील आरोपीला 20 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबाद- 2002 च्या गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणी गोध्रा न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.
गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने काल आरोपी रफिक भाटुक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी पंचमहाल पोलिसांनी विशेष कारवाई करून गोध्रा शहरातील एका भागातून भाटुकला फेब्रुवारी 2021 मध्ये अटक केली होती.

सुरुवातीला आरोप सिद्ध झाल्यानंतर भटुक फरार झाला होता, त्या काळात तो अनेक शहरांमध्ये राहत होता. अटक झाल्यानंतर या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला होता. विशेष सरकारी वकील आर. सी. कोडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भटुक हा या प्रकरणातील आतापर्यंतचा 35 वा आरोपी असून, त्याच्यावर न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला आहे. विशेष एसआयटी न्यायालयाने यापूर्वी या प्रकरणात 31 जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी 11 जणांना फाशीची तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, 27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून कारसेवकांना घेऊन परतणार्‍या ट्रेनला आग लावण्याच्या प्रकरणात भाटुकचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळं जातीय दंगलीही उसळल्या. यामध्ये 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami