संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

गोकुळवरील शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता ही नियुक्ती रद्द करण्यात आली असून याबाबत शिंदे सरकारकडून गोकुळला आदेश प्राप्त झाला आहे.

गोकुळमध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी झाल्यानंतर मुरलीधर जाधवांना सहज प्रवेश गोकुळमध्ये झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन करून हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली होती. शासन नियुक्त प्रतिनिधीला संचालक मंडळाने ठराव संमत करून सरकारकडे द्यावा लागतो. मात्र, त्यामध्ये गोकुळकडून तीन महिने दिरंगाई झाल्याने मुरलीधर जाधव यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर अलीकडेच शासन नियुक्त मुरलीधर जाधव यांच्यासह दोन स्वीकृत संचालक म्हणून युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची नियुक्ती झाली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुरलीधर जाधव यांच्या पाठिशी ठाम राहिल्याने गोकुळमधील सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले होते. त्यामुळेच मुरलीधर जाधव यांचा गोकुळमधील प्रवेश सुकर झाला होता. मात्र, सत्तांतर झाल्याने आता परिस्थिती बदलली आहे.
मुरलीधर जाधव यांनी सांगितले की, मात्र माझी तक्रार स्थानिक खासदाराने राज्याचे दूधविकास मंत्र्यांकडे केली होती. त्यावरही सद्धा महाराष्ट्रात सुरु असलेल्या गलिंच्छ राजकारणाचा मी बळी गेलो आहे. त्यामुळे माझी नियुक्ती रद्द केली. मात्र शिवसेनेचा खरा आहे. मी उद्धव ठाकरे सोबतच राहणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami