संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

गोकुळच्या दूध खरेदी दरातपुन्हा वाढ! शेतकरीवर्ग खुष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – कोल्हापुर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. या दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. गायीच्या दूध खरेदीमध्ये गोकुळने एक रुपयाची वाढ केली आहे, तर ही दरवाढ उद्या रविवार ११ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

गोकुळ दूध संघातील संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअगोदरही दूध दरवाढ झाली होती, त्यावेळी, जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात आले असल्याचे सांगितले होते. ही दरवाढ ऑगस्टमध्ये करण्यात आली होती.

दरम्यान, दुसरीकडे या अगोदर अमुलने १८ ऑगस्ट रोजी दरवाढ केली होती. डिझेल, पॅकिंगचा कच्चा माल आणि विजेच्या दरवाढीमुळे अमूलने दुधाच्या दरात वाढ केली असल्याचे सांगितले होते.म्हैस आणि गाईच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटरला सरसकट २ रुपये वाढ करण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami