गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात भरधाव ट्रक आणि काळीपिवळी वाहनांमध्ये समोरसमोर झालेल्या धडकेत काळीपिवळी वाहनातील एकाचा मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत त्याच वाहनातील 5 जण गंभीर जखमी झाले.
गोंदिया ते कोहमरा मार्गावर पाटेकुररा गावाजवळ ट्रक आणि काळीपिवळी वाहनाची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर स्थानिकांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता काळीपिवळीचा चक्काचूर झाला. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी गोंदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.