संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

गेट वे ऑफ इंडियाचा कायापालट करणार मुंबई पालिका १६ कोटी रुपये खर्च करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईत पाय ठेवला की पर्यटकांची पहिली पसंती असते ती गेट वे ऑफ इंडियाला भेट देण्याची! वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या याच गेट वे ऑफ इंडियाचा आता कायापालट केला जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १६ कोटी रुपये खर्च करणार आहे.त्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई,पदपथांचे सौंदर्यीकरण आणि आकर्षक झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल ठोंबरे यांनी दिली.
मुंबई शहराच्या सौंदर्य वाढविण्याचा पहिला टप्प म्हणून गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या परिसराचा कायापालट करण्याचे काम जलदगतीने केले जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचा आढावा घेतला.त्यावेळी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.त्यामुळे आता या वर्षाच्या अखेरीपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत ५० टक्के तर पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत ५० काम पूर्ण केले जाणार आहे.या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई.पदपथांचे सौंदर्यीकरण आणि आकर्षक झाडांची लागवड केली जाणार आहे.दरम्यान , मुंबईतील समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.तसेच उड्डाणपुलांची रंगरंगोटी,प्रत्येक विभाग कार्यालयातील १५ किलोमीटरचे रस्ते विद्युत रोषणाईने उजळून काढले जाणार आहेत.अशा मुंबईच्या एकूण सौंदर्यीकरण कामावर तब्बल १७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami