संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

गॅस गळतीने भोपाळ हादरलेक्लोरिन गॅसची अनेकांना बाधा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ- इदगाह हिल्स या भोपाळच्या जलशुद्धीकरण केंद्रात बुधवारी रात्री क्लोरीनच्या टाकीतून गॅस गळती झाली. त्याची बाधा झाल्यामुळे अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यातील ३ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे १९८४ च्या भोपाळ विषारी वायू गळतीची आठवण झाली. त्यामुळे अनेक जण धास्तावले.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण इदगाह हिल्स येथे आहे. काल रात्री तेथे पाणी स्वच्छ करण्यासाठी बसवण्यात आलेल्या क्लोरीनच्या टाकीतून वायू गळती झाली. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना झाला. डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. गॅस गळतीमुळे अनेकांना घराबाहेर राहावे लागले. या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलास सारंग यांनी घटनास्थळी घाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जलशुद्धीकरण केंद्रातील ९०० किलोच्या क्लोरीन सिलिंडरच्या नोझलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वायू गळती सुरू झाल्याचे उघडकीस आले. बचाव पथकाने कॉस्टिक सोडा टाकून परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र त्यामुळे अनेकांना त्रास झाला. ३ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami