कोल्हापूर : वेळोवेळी विविध मागण्या करून येथील माथाडी कामगारांकडून गुळाचे सौदे बंद पाडले जातात. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे कोल्हापुरात मार्केटयार्डातल्या माथाडी कामगारांना बाजार समितीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. १४४ कलम लावत जिल्हा प्रशासनाकडून या कामगारांना चांगलाच दणका देण्यात आला आहे.
कोल्हापुरात मार्केटयार्डातल्या माथाडी कामगारांना बाजार समितीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यातही विशेषतः गूळ माथाडी कामगारांना जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे सध्या परिसरामध्ये मोठा पोलीस अबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे माथाडी कामगार आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्षाची चिन्ह दिसत आहेत.
गुळाचे दर खूप कमी असतानाही माथाडी कामगारांकडून हमाली वाढीसाठी वारंवार सौदे बंद पाडले जातात. वेगवेगळी कारणे दिली जातात. या हंगामात सहा वेळा सौदे बंद पाडले गेले. हमाली वाढवून देणे, नवीन करार करणे यासह अनेक मागण्या या हमालांकडून वेळोवेळी केल्या जात आहेत. गुळाला हवा तो भावाच मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हमाली वाढवून देणे हे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या हमाली देण्याला आता विरोध करण्यात आला आहे. शेतकरीच हमालांच्या या मागण्याना कंटाळला आहे. त्यामुळे गुळाचे सौदे बंद पाडणाऱ्या या हमालांना प्रशासनाने हा दणका दिला असून, जिल्हा प्रशासनाकडून हा शेवटचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत विविशेषतः गुळाचे सौदे करणाऱ्या हमालांनाच प्रवेश बंदी करण्यात यावी. त्यांच्यावर १ ४४ कलम लागू करण्यात यावे. त्याचबरोबर नवीन हमाल भरण्याची सूचना देखील प्रशासनाकडून यावेळी देण्यात आली आहे.