संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

गुलाम नबी आझाद यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज त्यांच्या जम्मू येथील रॅलीमध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. माझ्या पक्षाचं नाव हिंदुस्तानी असेल. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई या सर्वांचा हा पक्ष असेल मात्र, नवीन पक्षाचे नाव आणि झेंडा हे काश्मीरचे लोक ठरवतील असेही आझाद यांनी यावेळी म्हटले आहे.

तसेच गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या अजेंड्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नव्हे तर गव्हर्नर असेल. लोकांना त्याच्या जमिनी मिळाव्यात. जम्मू-काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळावा. बिहारमधील कुणालाही जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळू नये. तसेच काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन व्हावे हा माझा अजेंडा आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या एका एका डोंगरात पर्यटन स्थळ निर्माण करून रोजगाराची निर्मिती करता येऊ शकते. जम्मू-काश्मिरातही पर्यटन स्थळ आहे. तिथपर्यंत रस्ते बनविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला जे करणं शक्य होतं ते मी केलं. जे करणं शक्य नव्हतं ते मी दिल्लीच्या माध्यमातून केलं. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी जम्मू-काश्मीरसाठी भरपूर काम केलं. डबल-ट्रिपल शिफ्टमध्ये मी काम केलं. ट्युलिप गार्डन माझ्याच कार्यकाळात तयार झालं आहे. प्रवासी निवाज हज हाऊस आणि अनेक कामे मी केले याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले. आहे. आम्ही आमच्या कष्टाने काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेस ही संगणकाने नाही, ट्विटरने नाही, तर आमच्या मेहनतीने स्थापन केली आहे. आमची बदनामी करणार्‍यांची पोहोच ही फक्त ट्विटर आणि संगणकावर असल्याचा टोला देखील आझाद यांनी यावेळी काँग्रेसला लगावला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami