संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

गुड न्यूज! २४ सप्टेंबरपासून अहमदनगर-आष्टी ट्रेन सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर – मराठवाड्यातील नागरिकांसाठी गुड न्यूज आली आहे. अहमदनगर ते आष्टी या ६६ किलोमीटर रेल्वे मार्गावर २४ सप्टेंबरपासून ट्रेन सेवा सुरू होणार आहे. रविवार वगळता ही ट्रेन रोज धावणार आहे. रेल्वेने या ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी-अहमदनगर मार्गावर नियमित ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. २४ सप्टेंबरपासून ही ट्रेन नियमित धावणार आहे. सोमवार ते शनिवार ६ दिवस नगर-आष्टी आणि आष्टी-नगर रेल्वे धावणार आहे. ती नारायणडोह, नवीन लोणी, सोलापूरवाडी, नवीन धानोरा आणि कडा या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. नगर येथून ही ट्रेन दररोज सकाळी ७.४५ वाजता सुटणार आहे. आष्टीला ती १०.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात आष्टी येथून सकाळी ११ वाजता ही ट्रेन सुटेल आणि नगरला दुपारी १.५५ वाजता पोहोचेल, असे रेल्वेने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami