नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात ५३ टक्के मतदान झाले. मतदानाला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली.गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 93 जागांवर सकाळी मतदान कमी प्रमाणात झाले मात्र दुपार नंतर मतदानाला वेग आला.दुपारी 3 वाजेपर्यंत 50.51 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
आज सकाळी 9 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे मतदान 4.75% झाले तर 11 वाजेपर्यंत 19.17% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी दुपारी 1 वाजेपर्यंत 34.74 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 50.51 टक्के मतदान झाले.विरमगाम ५६ टक्के ,अहमदाबाद ५०,आणंद५५,आरवली ५६,बनासकाठा ५७, गांधीनगर ५५,मेहसाणा५४,थराद ७२,नरोडा ४६, दानीलिम्डा४५, वडगाम ६० टक्के मतदान झाले.आज अहमदाबाद, वडोदरा आणि गांधीनगरसह 14 जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. त्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, पाटीदार नेता हार्दिक पटेल यांचा विरमगाम आणि अल्पेश ठाकोर यांच्या गांधीनगर दक्षिण मतदारसंघाचाही समावेश आहे. थरद विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वाधिक ६६.३९ टक्के मतदान झाले आहे.
उत्तर प्रदेशमधील एका लोकसभा आणि दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. मैनपुरी लोकसभा मतदारसंघात आज दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 43.93 टक्के, खतौलीमध्ये सुमारे 40.20 आणि रामपूरमध्ये सुमारे 26.32 टक्के मतदान झाले.पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीमध्ये थेट लढत आहे.