संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

गुजरात निवडणूक ड्युटीवरील जवानांचा
आपसात गोळीबार ! २ जवान शहीद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबाद – गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी आलेले जवानांच्या आपापसात झालेल्या गोळीबारात भारतीय राखीव बटालियनचे (आरपीएफ) दोन जवान शहीद झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.जवानांनी गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालं नाही.. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर एके ४७ मधून गोळीबार केला आहे. मात्र, गोळीबार झाला तेव्हा कोणताही जवान ऑन ड्युटी नव्हता. पोलीस सध्या या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी मृत जवानांचे सहकारी आणि जवानांच्या दुसऱ्या गटाच्या सहकाऱ्यांचीही चौकशी करत आहेत.पोरबंदरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ए.एम.शर्मा यांनी सांगितलं की, संध्याकाळी सैनिकांमध्ये कशावरून तरी आपसात वाद झाला, त्याचं रुपांतर काही वेळातच हाणामारीत झालं. यानंतर एका जवानाने आपल्या एके-47 रायफलमधून अनेक राऊंड फायर केले. या घटनेतील जवान भारतीय राखीव बटालियनचे (मणिपूर) असून ते सध्या गुजरातमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तैनात आहेत. जवानांमध्ये भांडण कशामुळे झाले याचा आम्ही सध्या तपास करत आहोत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami