संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

गुजरात दंगलीप्रकरणी मोदींना फाशी मिळावी
यासाठी तिस्ता सेटलवाड यांनी रचला होता कट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

एसआयटीचा धक्कादायक दावा

अहमदाबाद: गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना फाशी देण्याचा कट तिस्ता सेटलवाड यांनी रचला होता, असा एसआयटीचा दावा आहे. गुजरात दंगलीप्रकरणी विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले आहे. कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, निवृत्त डीजीपी आरबी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गोवण्याचा कट तिघांनी रचल्याचा आरोप आहे.
आरोपपत्रात म्हटले आहे की, पीडितांना गुजरातबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले, जिथे त्यांच्या त्रासाच्या नावाखाली देणग्या गोळा करण्यात आल्या. सेटलवाड आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही नेते एकत्र दंगलग्रस्तांच्या छावणीत गेले होते आणि गुजरातमध्ये न्याय मिळणार नाही, त्यामुळे राज्याबाहेरील न्यायालयात दाद मागावी, असेही त्यात म्हटले आहे. सरकारविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यामुळे एका साक्षीदाराचेही संजीव भट्ट यांनी अपहरण केले होते आणि नंतर बनावट प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, असेही सांगण्यात आले.
सेटलवाड यांच्यासह गुजरातचे निवृत्त पोलीस महासंचालक आर.बी.श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. याआधी जुलैमध्ये एसआयटीने आरोपपत्र दाखल केले होते की सेटलवाड आणि (दिवंगत) काँग्रेस नेते अहमद पटेल, भट्ट आणि श्रीकुमार यांनी एकमेकांशी संपर्क साधला आणि गोध्रा घटनेनंतर दंगल उसळल्यानंतर अनेक बैठका घेतल्या. त्यांच्याविरोधात १०० पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २००२ च्या गुजरात दंगल प्रकरणात बनावट पुरावे तयार केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कट आखला होता. सरकारचा भाग असतानाही आर.बी.श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांनी तिस्ता यांच्यासाठी खोटी कागदपत्रं तयार केली आणि नंतर त्यांचा अधिकृत कागदपत्रांमध्ये समावेश केला. दोषारोपपत्रातील दाव्यानुसार, आरोपींना नरेंद्र मोदींची राजकीय कारकीर्द संपवायची होती आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवायचा होता. खोटी कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी वकिलांची एक फौजच त्यांनी तयार केली होती. दंगलीतील पीडितांची फसवणूक करत जबरदस्तीने खोट्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आल्या. कागदपत्रं इंग्रजीत असल्याने पीडितांना आपण कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत आहोत याची कल्पना नव्हती असा एसआयटीचा दावा आहे. तिस्ता सेटलवाड यांनी पीडितांना मदत न केल्यास परिमाण भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती असा आरोप एसआयटीने केला आहे.आर बी श्रीकुमार यांनी तर एका साक्षीदारालाही धमकावलं होतं असा एसआयटीचा दावा आहे. “जर तुम्ही तिस्ता सेटलवाड यांना मदत केली नाही, तर मुस्लीम तुमच्याविरोधात उभे राहतील आणि दहशतवादी तुम्हाला लक्ष्य करतील. जर आपण आपापसात भांडत राहिलो, तर शत्रूला आणि मोदींना याचा फायदा होईल,” असं श्रीकुमार यांनी एका साक्षीदाराला सांगितल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात आहे. एकूणच या प्रकरणावर अहमद पटेल यांची मुलगी मुमताज पटेल यांनी एसआयटीच्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली होती आणि म्हणाली, “मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की हे अन्यायकारक आहे परंतु मृत व्यक्तीचे नाव वापरणे खूप सोपे आहे. तो स्वतःचा बचाव करण्यासाठी येथे नाही आणि त्याचे कुटुंब म्हणून आम्ही त्याच्या कामात सहभागी नव्हतो म्हणून आम्ही जास्त काही सांगू शकत नाही.’
तीन आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम १२०बी, ४६८, ४६९, ४७१, १९४, २११ आणि २१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या सेटलवाड यांची २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली. श्रीकुमार आणि भट्ट हे अन्य दोन आरोपी कोठडीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami