संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

गुजरात केडरचे अजय भादू यांची केंद्रीय निवडणूक उपायुक्तपदी नियुक्ती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली-भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अजय भादू यांची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी ते २० जुलै २०१९ रोजी गुजरात केडरचे प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रपतींचे सहसचिव म्हणून कार्यरत होते.
त्यांचा कार्यकाळ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळातच संपणार होता.मात्र त्यांना दोन महिन्यांसाठी सेवेची मुदतवाढ देण्यात आली होती.ती संपल्याने आता त्यांची नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उपायुक्त पदी करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami