गांधीनगर- गुजरातमध्ये आज दुपारी 3 वाजून 21 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता हा 4.3 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा राजकोटच्या उत्तर वायव्य सुमारे 270 किलोमीटर अंतरावर 10 किमी खोलीवर होता. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ट्विटरवरून दिली.
गेल्या तीन महिन्यांत गुजरातमध्ये आठ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. 23 फेंब्रुवारीला तीन किरकोळ भूकंपाचे धक्के गुजरातच्या अमरेली जिल्ह्याला जाणवले होते.अशात पुन्हा आज दुपारी गुजरातमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याने लोकांमघ्ये घबराटीचे वातावरण परसले होते. या भूकंपात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान अफगाणिस्तानातही आज भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रताही 4.3 इतकी होती. फैजाबादच्या दक्षिणेस 117 किमी अंतरावर 98 किमी खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या दोन्ही भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.