सुरत : काही दिवसांनी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यातच आता भाजपचे माजी उपाध्यक्ष पीव्हिएस शर्मा यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सुरतमध्ये पक्षाला धक्का बसला आहे.
आयकर विभागातील माजी सहाय्य आयुक्त असलेले पीव्हीएस शर्मा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला होता.सुरतमधील व्यापाऱ्यांवर त्यांची पकड आहे.त्यामुळे ते भाजपसाठी उपयुक्त आहेत.मात्र माजी उपाध्यक्ष पीव्हीएस शर्मा यांनी आज राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासालाही सामोरे जावे लागले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांना लिहिलेल्या पत्रात पक्षात त्यांची उपेक्षा होत असल्याचा आरोप केला आहे.दरम्यान ते भाजपचा राजीनामा देऊन अरविंद केजरीवाल यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास भाजपच्या बालेकिल्ल्यात केजरीवाल अधिक मजबूत होऊ शकतात अशी चर्चा आहे.