संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

गुजरातमध्ये पावसाचा कहर; अहमदाबाद शहरात सर्वत्र पाणीच पाणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबाद – गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अहमदाबाद शहराने तर जणू महासागराचे रूप धारण केले आहे. येथील रस्त्यांवर ३ ते ४ फूट पाणी साचले असून लोक गाड्या जागीच सोडून जीव मुठीत घेऊन पायी प्रवास करताना दिसत आहे. मात्र अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. याठिकाणी आजदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता, त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

अहमदाबादमधील अनेक इमारतींच्या पार्किंगमध्येही पाणी तुंबले आहे. दुचाकी गाड्या पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे, तर चारचाकी गाड्या अर्ध्या पाण्यात बुडाल्या आहेत. खरंतर केवळ अहमदाबादमध्येच नाही, तर संपूर्ण गुजरातमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात वाईट परिस्थिती सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातची आहे. वलसाड परिसरात सर्वत्र केवळ पाणीच पाणी दिसत आहे. मुसळधार पावसामुळे औरंगा नदी दुथडी भरून वाहत असून नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने किनाऱ्यावरील गावे, शहरे, शेत, घरे, दुकाने सर्व काही पाण्याखाली गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगा नदीच्या पाण्यात एक जेसीबी आणि त्याचा चालक अडकला होता. एनडीआरएफच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर या चालकाची सुटका केली. दरम्यान, छोटा उदयपूर, पंचमहाल, नर्मदा, भरूच, सुरत, भावनगर, राजकोट, अमरेली, जुनागड, वडोदरा आणि पोरबंदरमध्ये पावसाच्या सरींसह वाऱ्याचा वेगही प्रचंड आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami