संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गुजरातमध्ये ‘आप’पक्षाला रोखण्यासाठीच अटक सत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- अबकारी धोरणाशी काहीच संबंध नसताना विजय नायरला काल अटक झाली. त्यानंतर आज समीर महेंद्रू यांना ईडीने अटक केली. नेत्यांचे सुरू असलेले हे अटकसत्र आप’ला गुजरातमध्ये रोखण्याचा व चिरडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज येथे केला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे. सिसोदियांचे नाव घेण्यासाठी नायरवर दबाव आणला होता. पण त्यांनी नकार दिल्यामुळे सीबीआयने त्यांना अटक केली, असे त्यांनी सांगितले.
विजय नायर आपचे संपर्क प्रभारी आहेत. पूर्वी पंजाबमध्ये आणि आता गुजरातमध्ये दळणवळण रणनीती विकसित करून ती अंमलात आणण्याचे ते काम करत होते. मद्य धोरणाशी त्यांचा काहीच संबंध नाही. त्यानंतरही सीबीआयने त्यांना अटक केली.
त्यापूर्वी नायर यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा शिसोदियांचे नाव घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना अटक केली. त्यांच्या घरावर दोन वेळा छापे घातले. पण त्यात काहीच सापडले नाही. आपला चिरडण्यासाठी व गुजरात प्रचारात अडथळा आणण्यासाठी केंद्रातील भाजपने चालवलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. विजय नायर यांना काल अटक केल्यानंतर आज ईडीने समीर महेंद्रू यांना अटक केली. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही ते अटक करू शकतात, अशी भीती आपचे खासदार संजय सिंह यांनी व्यक्त केली. आपची लोकप्रियता वाढत आहे. गुजरातमध्ये आपला रोखण्यासाठी भाजप अनेक हातकंडे वापरत आहे. त्यात मनीष सिसोदियांच्या भोवती चौकशीचा फास आवळला आहे. त्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी अनेकांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात डांबले आहे. अमानतुल्लाह खान, विजय नायर आणि आता समीर महेंद्रू यांना झालेली अटक त्याचाच एक भाग आहे. अबकारी धोरणाशी नायरचा कुठलाही संबंध नाही. तरीही त्याच्यावर केलेली ही कारवाई आपला संपवण्याच्या हेतूनेच केली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami