संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गुजरातच्या खेडाचे भाजप आमदार
केसरी सोलंकीचा ‘आप’मध्ये प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १६० उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. त्यात जवळपास ३ डझन विद्यमान आमदारांचे तिकीट कापले. खेडा जिल्ह्यातील मातरचे आमदार केसरी सिंह सोलंकी यांचाही त्यात समावेश आहे. तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या सोलंकी यांनी भाजपचा राजीनामा देऊन अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षात प्रवेश केला. आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली.
सत्ताधारी भाजपने गुरुवारी १६० उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. त्यात मातर विधानसभा मतदारसंघातून कल्पेश परमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तेथील आमदार केसरी सिंग सोलंकी नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करून आपमध्ये प्रवेश केला. २०१४ आणि २०१७ मध्ये सोलंकी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतरही त्यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे नाराज झालेल्या सोलंकींनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आपमध्ये प्रवेश केला. केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणाने प्रभावित होऊन सोलंकींनी आपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आम्ही स्वागत करतो. गुजरातमध्ये प्रामाणिक सरकार आम्ही बनवू, असे इटालिया यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami