संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

गांधीनगर आशियातील
सगळ्यात प्रदूषित शहर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: – देशातील अनेक शहरांमधली हवेची गुणवत्ता हा मागील काही काळातला चिंतेचा विषय बनला आहे. सोमवारी जागतिक वायू गुणवत्ता सूची जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक खराब प्रदूषित हवा गुजरातची राजधानी गांधीनगर या शहरात असल्याचे दिसून आले आहे.

या यादीत आशिया खंडातील दहा शहरांचा समावेश आहे. त्यात चीनमधील पाच, मंगोलियातील एक आणि उर्वरित चार भारतातील आहेत. त्यात सर्वाधित प्रदूषित शहरात गांधीनगरचा क्रमांक पहिला लागला आहे. या शहराची वायू गुणवत्ता 724 इतकी गंभीर असल्याचे उघड झाले आहे. गांधीनगरनंतर गुवाहाटी इथला पानबाजार परिसर, भांडूप येथील खिंडीपाडा आणि देवास येथील भोपाळ चौराहा यांचा समावेश आहे. या शहरांची वायू गुणवत्ता अनुक्रमे 665, 471 आणि 315 इतकी आढळली आहे.

या अहवालानुसार, हवेची गुणवत्ता 0 ते 50 इतकी असल्यास उत्तम, 51 ते 100 असल्यास मध्यम, 101 ते 150 वृद्ध आणि लहान मुलांसाठी धोकादायक, 151 ते 200 अनारोग्यकारक, 201 ते 300 गंभीर आणि 300 ते अधिक म्हणजे अतिशय गंभीर असे मापन एकक ठेवण्यात आले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या