संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

गणेश दर्शनासाठी ‘बेस्ट’ची वातानुकूलित हो हो बस सेवा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना सार्वजनिक गणपतीचे दर्शन सुलभरीतीने करता यावे, याकरिता बेस्टने वातानुकूलित हो-हो बस सुरु केली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या दुमजली बस गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या बसने एका मंडळातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी प्रवासी थांबला असता दुसऱ्या बसने त्याच तिकिटावर गणेश दर्शनासाठी पुढे जाऊ शकतो. बस सेवा ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे. या बसगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रवर्तित होणार असून मेट्रो, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, नागपाडा, भायखळा रेल्वे स्थानक पूर्व, जिजामाता उद्यान, लालबाग, हिंदमाता, दादर रेल्वे स्थानक पूर्व, दादर टीटी या ठिकाणाहून वडाळा बस आगारापर्यंत चालवल्या जाणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami