संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गणपती उत्सवाचे मंडप तातडीने काढा नाहीतर कारवाई करणार !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी रस्त्याच्या बाजूस उभारलेले मंडप तातडीने काढून वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा दूर करा,अन्यथा कारवाई केली जाईल,असा इशारा पुणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने दिला आहे.
या उत्सवासाठी पुण्यात पालिकेने यावर्षी तब्बल २,३५३ गणेश मंडळांना परवानगी दिली होती.त्यात,१८२६ मंडळानी २०१९ मध्ये परवाना घेतलेला आहे, तर यंदा ५२७ मंडळे नव्याने वाढली आहेत.त्यांचे मंडप तसेच रनिंग मंडपाला महापालिकेने ३१ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत परवाना दिलेला आहे.परवाने देताना गणेशोत्सव संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मंडळांनी मंडप, रनिंग मंडप, तसेच देखाव्यांचे साहित्य काढून घेण्याचे बंधन घालण्यात आले होते. मात्र,अनेक मंडळांचे मंडप, डेकोरेशन साहित्य, जाहिरात कमानी रस्त्यावर तशाच आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत,त्याची दखल महापालिकेने घेतली आहे. मंडळांनी व मंडप व्यावसायिकांनी तातडीने आपले साहित्य काढून घ्यावे,अन्यथा कारवाई केली जाईल,असा इशारा अतिक्रमणविरोधी विभागाने दिला आहे. दरम्यान, गणेश मंडळांनी मंडप, साहित्य काढले आहे किंवा नाही, खड्डे दुरुस्त केले आहेत की नाही,याची पाहणी करण्याचे आदेश अधिकार्‍यांनी दिली आहेत

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami