संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
तब्बल ७०० वारकरी दिंडीत सहभागी !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा- तब्बल दोन वर्षानंतर यंदा आषाढी यात्रा निर्बंधमुक्त साजरी होणार आहे. यंदा आषाढीसाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. आज सकाळी ७ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील शेगावहून संत गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर, दुपारी नागझरी येथे आगमन आणि पारस येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावच्या या दिंडीचे हे ५३ वे वर्ष असून ७०० भाविकांसह सकाळी ही दिंडी शेगाव येथील मंदिरातून निघाली असून पायी ७५० किमी जाणार असून पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहचणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी शेगाव येथून निघाली आहे. या दिंडी सोहळ्यात ७०० वारकरी सामील झाले आहेत. ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल ७५० किमी अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. यावर्षी संत गजानन महाराजांच्या दिंडीचे हे ५३ वर्ष आहे. गेल्यावर्षी शेगाव संस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव निळकंठ दादा पाटील यांनी विधिवत पूजा आरती करून पालखीला प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या आहे. मोठ्या दिमाखात गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.दरम्यान, उद्या मंगळवारी दुसर्‍या दिवशी ७ जून रोजी गायगाव येथे पालखी प्रस्थान होईल ,रात्री भौरद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami