संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

खोटा दावा करत एसी लोकल प्रवाशांवर लादण्याचा रेल्वेचा प्रयत्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे,डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकांतून एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा खोटा असून केवळ प्रसिद्धीसाठी आणि एसी लोकल प्रवाशांवर लादण्याचा हा प्रयत्न असल्याची जाहीर टीका रेल्वे प्रवाशी संघटनांनी केली आहे.तसेच हा प्रवाशांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
काही दिवसांपूर्वी साधारण लोकलपेक्षा केवळ एसी लोकल संख्या वाढवली गेल्याने प्रवाशांकडून जोरदार विरोध झाला होता.त्यानंतर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली.पण त्याचवेळी दुसरीकडे एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या ठाणे,कल्याण आणि डोंबिवली स्थानकात अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याने प्रवासी संघटना संतप्त झाली आहे. या संघटनेने हा रेल्वे प्रशासनाने केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.मुंबई विभागात मध्य रेल्वे मार्गावर ५६ एसी लोकलसह १८१० लोकल सेवेत आहेत.उन्हाळ्यात एसी लोकल वाढवल्या होत्या.पण सध्या पुन्हा एसी लोकल रिकाम्या धावत आहेत.अशी परिस्थिती असूनही रेल्वे प्रशासन मात्र या लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा खोटा करत असल्याची टीका प्रवासी संघटनेने केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami