मुंबई – वांद्रे परिसरातील खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आज दुपारी स्फोट झाल्यानंतर आग लागल्याने एकच हळहळ उडाली.या आगीत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले. मात्र ही घटना कशामुळे लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट झाले आहे.
वांद्र पूर्वमध्ये रहिवाशी परिसरात असलेल्या खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आज नेहमीप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू होते. मात्र अचानक आज दुपारी साडेबाराच्या सुमारास खेरवाडी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये स्टोअर रुममध्ये स्फोट होऊन मोठी आग लागली. या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.