संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

खेडशिवापूर टोलनाक्यावर
2 एप्रिलला जनआंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणे-सातारा महामार्गावरील हवेली तालुक्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर भोर आणि वेल्हा तालुक्यातील स्थानिक लोकांकडून टोलवसुली करण्यात येत आहे. हा टोलवसुली बंद करण्याबाबत 2 एप्रिलला टोलनाक्यावर भव्य जनआंदोलन करण्याचा ठराव शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.
हा टोलनाका हटावसाठी सर्वपक्षीय स्थापित असलेल्या शिवापुर टोलनाका हटाव कृती समितीची बैठक केळवडे येथे गुरुवारी दुपारी पार पडली. बैठकीत मितीचे सदस्य ज्ञानेश्वर दारवटकर म्हणाले की, ‘मागील आंदोलन हे मोडीत काढण्याचे काम काही शकुनी मामाच्या पाठिंब्याने पोलिसांनी केले होते. यासाठी सर्वपक्षाच्या नेत्यांनी आदेश देऊन हालचाल करणे गरजेचे आहे. मात्र ते दिसून येत नाही. टोलनाका हटविण्यासाठी सर्वपक्षांच्या वतीने आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करुया.समितीचे सदस्य शैलेश सोनवणे म्हणाले की, ‘खेड शिवापूर टोलनाकाबाबत प्रशासनाची नीती कायम ब्रिटिशासारखी आहे. 2 एप्रिलला होणारे आंदोलन हे शेवटे असून कोल्हापूरच्या धर्तीवर टोलनाका हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र घेऊन तळागाळात जावून जनजागृती करणे गरजेचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या