संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

खिलारींचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मंचर: मुक्तादेवी यात्रा उत्सवनिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला आहे,अशी माहिती यात्रा कमिटीचे संयोजक आणि भिमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी दिली. लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशासनाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली असून प्रथमच खडकी येथे शर्यतीचा थरार रंगला होता.
मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत तब्बल ८१५ बैलगाडा मालकांनी नोंदणी केली.घाटाचा राजा हा किताब गोविंद खिलारी यांच्या बैलगाड्याने पटकावला. शर्यतीच्या पहिल्या दिवशी जिजाबा वाघमारे, सगाजी पाटील व सरपंच नारायण बांगर यांच्या हस्ते शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन झाले. प्रथम क्रमांकात खेड येथील अजिंक्य खांडेभराड यांचा बैलगाडा फळीफोड ठरला आहे. द्वितीय क्रमांकात सावरगाव येथील शिवाजीराजे चिकणे,तर तृतीय क्रमांकात गुंडाळवाडी येथील संतोष भोर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami