मुंबई – दिवाळीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घडत आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणून भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. त्याप्रसंगी माजी महापौर नरेश म्हस्के हे देखील उपस्थित होते. शर्मिला ठाकरे यांनी वृशाली श्रीकांत शिंदे यांचे औक्षण करून स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्या भेटी पाठोपाठ आता श्रीकांत शिंदे यांनी भेट घटल्याने मनसेसोबत शिंदे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून
येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरला शिवाजी पार्क येथे दीपोत्सव आयोजित केला. या दीपोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी उपस्थिती लावली. दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील फडके रोड येथील जवळच असलेल्या मनसे कार्यालयाला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठे वक्तव्य केले होते. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील व आशिष शेलार यांनी मनसेसोबत युतीच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे व फडणवीस सरकार एकत्र येण्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.