संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

खासदार शशी थरूर यांच्या पायाला गंभीर दुखापत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली:- तिरूअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गुरुवारी १५ डिसेंबर रोजी संसद भवनातील पायऱ्यांवरून त्यांचा पाय घसरला त्यात थरूर यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून पायाला प्लॅस्टर घालावे लागले आहे. त्यांनी ट्विटरवरून रूग्णालयातील फोटो शेअर केला आहे.

थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “काल संसदेत पायऱ्यांवरून उतरत असताना माझा पाय घसरला. त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली. काही तास काही वाटले नाही. नंतर वेदना वाढल्याने मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. आज संसदेत येऊ शकत नाही. तसेच मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. या ट्विटसोबत थरूर यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत. ज्या ते रुग्णालयातील बेडवर झोपलेले दिसत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami