संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

खासदार ओमराजेंसह ग्रामपंचायतील‌ उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उस्मानाबाद:- सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवरून खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे आणि उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. पत्रात खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ‘बाळ’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह त्यांची उमेदवार असलेली, आई कांताबाई यांना ही धमकी मिळाली आहे. अज्ञाताने लिहिलेल्या या पत्रामुळे गावात तसेच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून त्वरीत कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा साळवे कुटुंबियांनी दिला आहे.

अज्ञाताने या पत्रात लिहिले की, ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघारी घे. शेवट पाठिंबा दे. नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा शाजदार ओम बाळ तुझा कलेक्टर व तुला नाही तर बघून घेऊ. वेळी आली तर संपवून टाकू. हितून तुझ्या आईला मतदान कोण करतय ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरलापण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय? अशी धमकी या पत्रातून दिली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर आणि राणा रणजित सिंह पाटील यांच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी झाली होती. यावेळी पाटील यांनी ओमराजे यांचा उल्लेख ‘बाळ’ असा केला होता. नेमके तोच शब्द इथे वापरण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्यातल्या मसला खुर्दमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून रामेश्वर वैद्य हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडले गेलेत. विशेष म्हणजे 11 पैकी 7 जागाही बिनविरोध निवडल्यात. आता उर्वरित 4 जागांसाठी 2 पॅनल रिंगणातयत. त्यासाठी 2800 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यातल्या एका जागेवर ज्ञानेश्वर साळवे या रिंगणात आहेत. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी ही धमकी देण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami