मुंबई- भारतात स्पेस रॉकेट म्हटल की पहिले महत्वाचे नाव येत ते विक्रम साराभाई. भारतातील एका खासगी कंपनीने तयार केलेल पहिले रॉकेट लवकरच उड्डाण घेईल. त्याच नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आल आहे.
स्कायरूट एरोस्पेस हे त्या खाजगी कंपनीच नाव आहे. स्कायरूट एरोस्पेस 2018 ला स्थापन हैदराबाद येथील खाजगी स्पेस स्टार्टअप आहे. खडठज मध्ये काम केलेले माजी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची टिम स्कायरूट साठी काम करते. त्यांच्या ’प्रारंभ’ मिशनचा एक भाग म्हणून विक्रम-एस, भारतातील पहिले खासगीरित्या विकसित रॉकेट या 12 ते 16 तारखे दरम्यान अंतराळात प्रक्षेपित होईल. हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे कारण देशातील रॉकेट क्षेत्र आतापर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (खडठज) च्या ताब्यात होत. हे क्षेत्र आता भारताच्या तरुणाईला खुल झालय. स्कायरूट एरोस्पेस म्हणत की आम्ही आजच्या तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडून सर्वांसाठी स्पेस खुलं करण्याच्या मोहिमेवर आहोत.