संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

खलिस्तान समर्थक अमृतपालच्या सहकार्‍याची अखेर तुरुंगातून सुटका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमृतसर-अपहरण प्रकरणात कट्टरपंथी धर्मोपदेशक अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंग याच्या सुटकेचे आदेश पंजाबच्या अजनाला येथील न्यायालयाने शुक्रवारी दिले. अमृतपालच्या समर्थकांनी येथील पोलीस ठाण्यात गोंधळ घातला आणि त्याच्या सुटकेची मागणी केल्यानंतर एका दिवसानंतर न्यायालयाचा हा आदेश आला.पंजाब पोलिसांच्या एका पोलिस उपअधीक्षकाने लवप्रीत सिंग उर्फ ​​तुफानची कोठडीतून सुटका करावी कारण तो या प्रकरणात सहभागी नसल्याच्या नसल्याचे सांगत त्याच्या सुटकेसाठी न्यायालयात अर्ज केला होता.

अजनाळ्याच्या उपविभागीय न्यायदंडाधिकारी मनप्रीत कौर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, तपास अधिकाऱ्याला आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची आवश्यकता नसल्यामुळे,लवप्रीत सिंगची कोठडीतून सुटका करून सोडण्यात आले.या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित स्थानक प्रभारींना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या संदर्भातील आवश्यक माहिती कारागृह अधीक्षक, अमृतसर यांना पाठवावी.

अजनाला येथे पत्रकारांशी बोलताना अमृतपाल सिंग यांनी आपल्या सहकाऱ्याची सुटका हा पंथाचा विजय असल्याचे म्हटले. अमृतपालचे अनेकदा खलिस्तान समर्थक म्हणून वर्णन केले जाते आणि तो ‘वारीस पंजाब दे’ नावाच्या संघटनेचा प्रमुख आहे. अमृतपालने सांगितले की, लव्ह प्रीतला खोट्या खटल्यात तुरुंगात टाकण्यात आले तसेच पोलिसांनी गुरुवारी आमच्या काही समर्थकांविरुद्ध कोणत्याही चिथावणीशिवाय बळाचा वापर केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या