जबलपूर- देशातील रस्ते चांगल्या दर्जाचे असावेत यासाठी नेहमीच प्रयत्नशिल असणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खराब रस्त्यांबाबत मध्यप्रदेशमध्ये जनतेची माफी मागितली आहे.सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करुन देखील रस्ते चांगले झाले नसल्याची खंत गडकरींनी यावेळी व्यक्त केली.
जबलपूर येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या १३ प्रकल्पांचे भुमिपूजन मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. गडकरी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ४,०५४ कोटी रुपयांच्या अंदाजे २१४ किलाे मीटर लांबीच्या आठ रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि भुमिपूनज केले.त्यावेळी मंत्री गडकरी बाेलत हाेते. गडकरी पुढे म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात सहा लाख कोटी रुपये रस्त्यांसाठी देतील. राज्य सरकारने भूसंपादन आणि वन विभागाच्या मंजुरीसाठी गती द्यावी. विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत.४०० काेटी रुपये खर्चून बारेला ते मांडला या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या ६३ किलाे मीटरचा टू लेन रोडवरील कामांबाबत मी समाधानी नाही असे त्यांनी नमूद केले.तसेच रखडलेल्या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याची सूचना देखील अधिकार्यांना करण्यात आली.जुने काम दुरुस्त करुन आणि नवीन निविदा मागवत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देत आतापर्यंत तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफ करा,असे गडकरी यांनी म्हटले.