संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

खडसेंच्या मुक्ताईनगरात मंगळवारी शिंदेेंचा दौरा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर अर्थात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या गडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा निश्चित झाला आहे. मंगळवार 20 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते हजेरी लावणार असून त्यांच्यासोबत त्यांच्याच गटाचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत व अब्दुल सत्तार या चार मंत्र्यांचाही सहभाग असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच जळगाव जिल्हा दौरा असून एकनाथ खडसे यांच्याबद्दल ते काय बोलतात याकडे सार्‍या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे सोबत त्यांच्या गटाच्या गुलाबराव पाटील ,दादा भुसे,उदय सामंत आणि अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती असणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami