संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

खंडाळा घाटात मध्यरात्री केमिकल ड्रमचा टेम्पो अचानक जळून खाक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

खोपोली – मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटातील पुणे लेनवर मॅजिक पॉइंटजवळ काल गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका केमिकल ड्रम घेऊन चालेल्या टेम्पोने अचानक पेट घेतला.यावेळी सुदैवाने चालक आणि क्लीनरने हा टेम्पो थांबवून बाहेर उड्या मारल्याने ते बचावले.मात्र या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. हा टेम्पो भिवंडी येथून हैदराबादकडे केमिकलचे ड्रम घेऊन चालला होता.त्यावेळी बोर घाटात टेम्पो आल्यावर टेम्पोने अचानक पेट घेतला. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने हँडब्रेक लावून गाडी थांबवली आणि दोघांनीही गाडीतून बाहेर उड्या मारल्या.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.या टेम्पोने पेट घेतल्याचे कळताच खोपोली पोलीस आणि अग्निशमन दल तसेच एमआयडीसी पाताळगंगा, उत्तम कंपनी, टाटा स्टील, एचपीसीएल कंपनीचे फायर ब्रिगेडचे युनिट तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.या सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली.मात्र तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.साधारण मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील वाहन वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami