संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

क्रिमिया-रशियाला जोडणाऱ्या पुलाचे स्फोटामुळे नुकसान! वाहतूक स्थगित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को- क्रिमिया आणि रशियाला जोडणाऱ्या पुलावर शनिवारी मालगाडीला आग लागली. त्यामुळे झालेल्या स्फोटात पुलाचा काही भाग कोसळला. आग आणि स्फोटामुळे पुलाचे नुकसान झाल्याने त्यावरील वाहतूक बंद केली आहे. या घटनेच्या काही तास अगोदर युक्रेनच्या पूर्व खारकीव शहरात अनेक शक्तिशाली स्फोट झाले होते.

क्रिमिया आणि रशियाला जोडणाऱ्या पुलावरून शनिवारी मालगाडी जात होती. त्यावेळी तिला आग लागली. नंतर तिच्या काही इंधन टँकरचे स्फोट झाले. त्यात पुलाच्या दोन भागांचे नुकसान झाले. काही ठिकाणी त्याचा भाग ढासळला. त्यामुळे पुलावरील वाहतूक स्थगित केली आहे. मालगाडीच्या इंधनाचे टँकर पुलावरून जात असताना ही दुर्घटना घडली. त्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या काही तास अगोदर युक्रेनच्या खारकीव शहरात एकापाठोपाठ एक असे अनेक शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे आता रशियाला दक्षिण युक्रेनला रसत पुरवणे कठिण झाले आहे. या स्फोटामागे युक्रेनच असल्याचा आरोप क्रिमियातील रशिया समर्थक पार्लमेंटच्या अध्यक्षांनी केला आहे. पुलावर हल्ला करण्याची धमकी त्यांनी यापूर्वी अनेकदा दिली होती. तथापि, या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. इंधनाचे टँकर असलेल्या मालगाडीच्या ७ डब्यांना पुलावर आग लागली. त्यानंतर त्यांचे स्फोट झाल्यामुळे पुलाचे २ भाग अर्धवट कोसळले. १९ किलोमीटरचा हा पूल २०१८ मध्ये सुरू झाला होता. केर्च समुद्रधुनीवर हा पूल आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami