नवी दिल्ली : नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली नेझल लस ‘इनकोव्हॅक’ आजपासून उपलब्ध झाली आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही लस विकसित केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही नेझल व्हॅक्सिन ‘इनकोव्हॅक’ लाँच केली. ही लस खासगी रुग्णालयांमध्ये प्रति शॉट ८०० रुपये, तर सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ ३२५ रुपये प्रति शॉट या दराने उपलब्ध केली जाईल.
बुस्टर लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. आता नेजल ही अशी लस आहे जी नाकातून थेट दिली जाईल. ते कोणालाही अगदी सहज देता येते. यामध्ये त्याला इंट्रानासल लस म्हणतात. आता डोस देण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनची गरज भासणार नाही. भारत सरकारने २३ डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती. या नेजल लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सामान्यतः कोरोनाचा बूस्टर डोस किंवा प्राथमिक लस म्हणून दिली जाऊ शकते. ही नेजल लस कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लस घेतलेल्यांसाठी बूस्टर म्हणून दिली जाऊ शकते. या लसीचे बुकिंग फक्त कोवीन पोर्टलवरून केले जाणार आहे.