संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

कोळसे पाटील, ज. वि. पवार नवा राजकीय पक्ष काढणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील,ज्येष्ठ लेखक आणि दलित पँथर संस्थापक ज. वि. पवार आणि सामजिक आणि राजकीय कार्यकर्ते मिलिंद पखाले आता नव्या राजकीय पक्ष काढणार आहेत. याबाबत हे तिन्ही नेते मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी घोषणा करणार आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षाची जोरदार लगबग सुरु आहे. आपल्या पक्षाची वातावरण निर्मिती करण्यासाठी पक्ष रस्त्यावर उतरुन वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत, तर दुसरीकडे नवे पुढारी देखील महापालिकांच्या निवडणुकीत नशीब आजमवण्यासाठी धडपत करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता बी. जी. कोळसे पाटील, ज. वि. पवार आणि मिलिंद पखाले हे आपला नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यासाठी ते गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami