संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

कोल्हापूर हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांची आज संयुक्त बैठक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- कोल्हापूर शहर हद्दवाढीची समर्थक असलेली कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती आणि विरोध करणार्‍या ग्रामस्थांची हद्दवाढविरोधी समिती यांची उद्या रविवार २५ सप्टेंबर रोजी एक संयुक्त बैठक होणार आहे.दोन्ही बाजूंकडून एकमेकांशी सुसंवाद साधला जाणार आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता महाराणा प्रताप चौकातील कृती समितीचे निमंत्रक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या कार्यालयात बैठक होईल.

पोवार यांच्या कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत संयुक्त बैठकीचे निमंत्रण विरोधी समितीला देण्यात आले. विरोधी समितीच्या सदस्यांनीही बैठकीचे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगण्यात आले.कोल्हापूरची हद्दवाढ झाल्याशिवाय शहरासह जिल्ह्याचा विकास होणार नाही.परिणामी, हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले आहेत. रोज वेगवेगळ्या पद्धतीने हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हद्दवाढीत समाविष्ट गावांनीही तीव्र विरोध सुरू केला आहे.त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंच्या सदस्यांची बैठक होत असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हद्दवाढीचे समर्थक आणि विरोधक आपापली बाजू बैठकीत मांडणार आहेत. पोवार यांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली.पोवार यांच्यासह बाबा पार्टे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, दिलीप देसाई, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, किशोर घाटगे यावेळी उपस्थित होते.त्यात कोल्हापूर शहरातील तीन खासदार, सर्व आमदार यांचा समावेश होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami