संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून कोल्हापूर विमानतळावर स्टार एअरचे विमान मुंबईहून दुपारी 12.05 पोहोचणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली.
त्यांनी पत्रकात म्हटले आहे की,केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करून सेवा सुरू करण्याचा आग्रह केला. त्यामुळे स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 72 प्रवाशांची क्षमता असलेले विमान 4 ऑक्टोबरला सकाळी 11.05 ला मुंबई विमानतळावरून उड्डाण करेल आणि दुपारी 12.05 ला कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर हेच विमान साडेबाराला कोल्हापुरातून उड्डाण करून दुपारी दीडला मुंबई विमानतळावर पोहोचेल. स्टार एअरचे प्रमुख पदाधिकारी श्रेणिक घोडावत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. या विमान सेवेमुळे कोल्हापुरातील प्रवाशांचा मुंबई प्रवास अधिक गतीने आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami