संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

कोल्हापूरात मटका, व्हिडिओ गेमबंद होण्यासाठी मनसे आक्रमक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मटका आणि व्हि़डिओ गेम बंद व्हावा यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. कोल्हापूरातील अवैध धंदे बंद होण्यासाठी मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा काढला आहे.यावेळी प्रतिकात्मक मटकेवाल्यांना घोड्यांवर बसून वरात काढण्यात आली. दिवाळीपर्यंत हे अवैध धंदे बंद झाले नाही तर मनसे स्टाइल दाखवण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

वर्षभरापासून ‘मोका’ धास्तीने थंड पडलेला मटका शहर परिसरात पुन्हा डोके वर काढू लागला. मोबाईलवरील मटका सध्या अधिक जोमात आहे. हे पोलिसांनी गेल्या चार ते पाच दिवसातील कारवाईतून उघड झाले आहे. याचा विळखा जिल्ह्याला बसेल. त्यामुळे जाळ्यात बेरोजगार अडकतील अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या विषयावर मनसे कोल्हापूरात आक्रमक झाली. मटका आणि व्हिडिओ गेम बंद व्हावे अशी मागणी मनसेकडून केली जात आहे. यावेळी प्रतिकात्मक मटकेवाल्यांना घोड्यांवर बसून त्यांची वरात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आली. याशिवाय बनावट नोटांची उधळण यावेळी करण्यात आली.गेले कित्येक वर्षे हे अवैध धंदे सुरु असल्याचे करमणूक अधिकाऱ्यांना माहिती असून त्यांच्यावर कारवाई होत नाही.आज मटके आणि हे सर्व अवैध धंदे चालवणारे मोठमोठ्या गाड्यांमधून फिरत आहेत.त्यांनी सामान्य नागरिकांना मटक्याची सवय लावून हा धंदा जोमात चालू ठेवला आहे. त्यामुळे सर्व बेरोजगार यात अडकत आहेत.तरीसुद्धा शासनाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याचे,मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami