संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

कोल्हापुरात जत्रेत पाळणा तुटला एकाच कुटुंबातील ५ जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापुर – आपल्या घरातील सदस्यांना जत्रेतील मुलांना पाळण्यात बसवताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात जत्रेतील पाळणा तुटल्याने पाच जण जखमी झाले आहेत. यामुळे जत्रेत एकच गोंधळ उडाला होता.जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव जत्रा भरवली होती या जत्रेत विविध प्रकारचे पाळणे होते.यापैकीच एक असलेल्या ड्रगन रेल्वेत अनेकजण बसले होते.ही ड्रगन रेल्वे वेगाने फिरायला सुरुवात झाल्यावर त्याचा मागील डब्बा अचानक तुटला व १० फुटांवरुन खाली जमिनीवर कोसळला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. हे पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याचे समजत आहे. या घटनेमुळे जत्रेत एकच खळबळ उडाली होती.यानंतर ड्रगन रेल्वे तात्काळ थांबविण्यात आली.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami